Mumbai Rain : मुंबईच्या पावसाचा पुनर्वसन मंत्री व आमदारांना फटका! अमोल मिटकरींवर रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ

0
21
Mumbai Rain : मुंबईच्या पावसाचा पुनर्वसन मंत्री व आमदारांना फटका! अमोल मिटकरींवर रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ


काय म्हणाले आहेत अमोल मिटकरी?

या व्हिडिओत बोलतांना अमोल मिटकरी म्हणाले, दोनचार आमदार व मंत्री अनिल पाटील आम्ही या पावसात अडकून पडलो आहे आमची एक्सप्रेस गाडी ही एकाच ठिकाणी उभे असून अधिवेशनाठी मंत्रालयात जायचे असल्याने आम्ही चालत निघालो आहोत. आम्ही दादर व कुर्ला स्टेशनच्या मध्ये अडकून पडलो आहोत. पावसामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं असून विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असल्याने आम्ही मंत्रालयात जात आहोत. मात्र, पावसामुळे प्रवासात आमचे मोठे हाल झाले आहेत. पावसाची तीव्रता कमी होऊन लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा असल्याचे मिटकरी म्हणाले.



Source link