
Mumbai, Pune weather update : मुंबईत १३ मे रोजी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता. या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा वाढला वाढला आहे. बुधवारी उष्णतेमुले नागरिक बेजार झाले होते. आज गुरूवारी देखील हीच परिस्थिती कायम आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस घामाच्या धारा सोसाव्या लागणार आहेत. मुंबईत बुधवारी ३७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर पुण्यात देखील हीच परिस्थिति आहे. अवकाळी पासून आणि वाढते उन असा दुहेरी मारा पुणेकर सहन करत आहेत. सकाळी, दुपारी उन्हाची तीव्रता वाढत असून संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. पुण्यात बुधवारी ३७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.







