
संपूर्ण राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह असताना तसेच रांगोळ्या, भव्य शोभायात्रांनी जल्लोषी वातावरण असताना विरारमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे एका सेफ्टी टँकमध्ये बुडून चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





