Mumbai news : मुंबईतील चार बेकायदेशीर हॉटेल बारवर बुलडोझर; पोलिस, पालिकेच्या अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त कारवाई

0
17
Mumbai news : मुंबईतील चार बेकायदेशीर हॉटेल बारवर बुलडोझर; पोलिस, पालिकेच्या अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त कारवाई


या कारवाईबद्दल माहिती देतांना एका अधिकाऱ्याने संगितले की, आम्ही संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. आम्ही महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील अशा चार ते पाच बिअर बारवर व हॉटेलवर छापे टाकले आहेत आणि या हॉटेलचे बेकायदेशीर भाग बुलडोझरच्या साह्याने पाडण्यात आले आहे. हे बिअर बार व हॉटेल बेकायदेशीर कामांमध्ये गुंतले होते. या बाबतच्या अनेक तक्रारी आम्हाला मिळाल्या होत्या. पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही या बारवर छापा टाकला तेव्हा काही छुप्या खोल्यामद्धे बार गर्ल्सना लपवण्यात आले होते. ग्रँट रोड येथील स्टर्लिंग बार आणि आर्यन बिअर बार, पूजा बार डीबी मार्ग आणि सांताक्रूझ पश्चिम येथील गझदर बँड मार्गावरील स्टार नाईट बारवर ही कारवाई करण्यात आली आहे.



Source link