Mumbai local train : लोकलमध्ये १५ वर्षीय मुलीसोबत लैंगिक चाळे; किस करण्याचा प्रयत्न, प्रवाशांनी आरोपीला धु-धु धुतलं

0
16
Mumbai local train : लोकलमध्ये १५ वर्षीय मुलीसोबत लैंगिक चाळे; किस करण्याचा प्रयत्न, प्रवाशांनी आरोपीला धु-धु धुतलं


ट्रेन वांद्रेत पोहोचल्यानंतर आरोपीने अचानक मुलीच्या गळ्यात हात टाकला व तिला मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या वडिलांनी व अन्य प्रवाशांनी त्याला बाजुला सरकण्यास सांगितले, मात्र तो मुलीच्या चेहऱ्यासमोर उभा राहून तिला किस करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर त्याला पकडले व त्याची यथेच्छ धुलाई करण्यात आली. ट्रेन अंधेरीत पोहोचल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीचे वडील व अन्य लोकांनी त्याला पकडून ठेवले. त्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी जखमी असल्याने त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले. 



Source link