
Mumbai Local Train Viral Video : महिलांच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून लोकलमधून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये तुफान मारामारी झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्रेनच्या दारात उभं राहून एका तरुणाने दुसऱ्याला शिवीगाळ केली, त्यानंतर प्रकरण वाढताच दोघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी तातडीने मध्यस्थी करत वाद मिटवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.








