
मुंबईहून सुटलेली धिम्या गतीची रेल्वेगाडी टिटवाळाच्या दिशेने जात होती. ही रेल्वेगाडी रात्री ९.२० वाजता मुंब्रा रेल्वे स्थानकात आली असता, गाडीचा पहिला डबा प्लॅटफॉर्मला घासला.त्यामुळे रेल्वेगाडी मुंब्रा रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली. त्याचा परिणाम डोंबिवली, कल्याणच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्वच धिम्या गतीच्या रेल्वे वाहतूकीवर झाला.







