
गिरगावमधील १४ मजली गणेश कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्टमध्ये आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमनदलाच्या जवानांनी इमारतीतील २७ जणांना इमारतीच्या गच्चीवर नेले. यामध्ये १७ महिला, पाच पुरुष आणि पाच मुले होती, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.







