Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

0
15
Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त


Mumbai Crime news : लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली जात आहे. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. या धामधुमीत मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. शनिवारी रात्री वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या एका कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली असून येथून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. येथे ५, १०, २०, १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या.



Source link