
आरोपी मोहसीन शेख याचे भाऊ जाफर, मोबिन, मेव्हणा अश्फाक शेख यांनी तिचा विनयभंग केला होता. काका इम्रान बागवान याने तिला मारहाण केली. आरोपी मोहसीन याची आई शहनाज हिने देखील इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला, अशी तक्रार पीडितेने तक्रारीत केली आहे. या तक्रारी वरून नया नगर पोलिसांनी ६ जणांविरोधात फसवून, बलात्कार, विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.





