
मु्ंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश कोमलसिंग राजपूत यांनी हा निर्णय दिला आहे. पत्नीला दिल्या जाणाऱ्या पोटगीच्या रक्कमेत कपात करण्याची मागणी पतीकडून करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही मागणी नाकारली. कोर्टाने म्हटले की, पत्नीच्या पोटगीत तीन श्वानांच्या देखभालीचा खर्चाचाही समावेश आहे. पाळीव प्राणीदेखील सुसंस्कृत जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत आणि माणसाला निरोगी जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहेत, असे कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.





