Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी; नियंत्रण कक्षाला खळबळजनक मेसेज

0
14
Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी; नियंत्रण कक्षाला खळबळजनक मेसेज


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रओण कक्षाला बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा मेसेज आला होता. आरोपी दिलीप राऊत याने मुंबईतील नागपाडा परिसरात साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने तातडीने नागपाड्यातील गर्दीच्या ठिकाणी धाव घेतली. संपूर्ण परिसराची तपासणी केल्यानंतर पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नव्हती. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी दिलीप राऊत याला नायर रुग्णालय परिसरातून अटक केली आहे. धमकीच्या मेसेजनंतर आरोपीला अटक करण्यात आल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.



Source link