Mumbai Air Pollution: मुंबईची हवा पुन्हा बिघडली! उपाययोजना ठरतायेत फोल

0
14
Mumbai Air Pollution: मुंबईची हवा पुन्हा बिघडली! उपाययोजना ठरतायेत फोल


Mumbai News : मुंबईत तापमान कमी झाले आहे. मुंबईकर गुलाबी थंडी अनुभवत असतांना त्यांना प्रदूषणालाही तोंड द्यावे लागत आहे. शहरात थंडी सोबतच हवेची गुणवत्ता ढासळली असल्याचे पुढे आले आहे. हवेतील आर्द्रता व धुके यामुळे हवेची गुणवत्ता खालावली असल्याचे सफरच्या अहवालात पुढे आले आहे. सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक हा १९० च्या पुढे होता. तर हा निर्देशांक सोमवारी मध्यम होता. वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता सर्वाधिक वाईट नोंदवली गेली. आज मंगळवारी देखील काही केंद्रांवरील हवा वाईट श्रेणीत असल्याचे नोंदवण्यात आले आहे.



Source link