
मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलिस सोशल मीडियावर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, यूपी पोलिसात तैनात असलेल्या एका हवालदाराने मुख्तार अन्सारी यांच्याबाबत त्याच्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस पोस्ट केल्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
उत्तर प्रदेशातील माफिया मुख्तार अन्सारीचं (Mukhtar Ansari ) निधन झालं आहे. एकीकडे मुख्तार अन्सारीच्या मृत्यूवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे मुख्तारच्या कुटुंबीयांनी मुख्तारला तरुंगात स्लो पॅायझन दिल्याचा आरोप केला आहे. या मुदद्यवरुन यानंतर आता राजकीय वातावरण चांगल तापलं आहे. सपासह सर्व विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. माजी डीजीपी सुलखान सिंग यांनीही मुख्तारच्या मृत्यूसंदर्भातील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, उत्तर प्रदेशमधे हवालदार फैयाज खानने माफिया मुख्तार अन्सारीचंचं व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याने नवा वाद सुरू झाला आहे. डीसीपी उत्तर यांनी फैयाज खान यांना निलंबित करण्याची परवानगी देण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे.
हे सुद्धा वाचा
व्हॉट्सॲप वर ठेवलं स्टेटस
माफिया मुख्तार अन्सारीच्या समर्थनार्थ राजकीय पक्ष उघडपणे समोर येत असताना, राजधानी लखनऊमधे पोलीस ठाण्यात तैनात कॉन्स्टेबल फैयाज खान यांनी मुख्तार अन्सारीच्या समर्थनार्थ एक पोस्ट केला आहे. फैयाज खान यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवरील एका पोस्टमध्ये मुख्तार अन्सारी यांचे शेर-ए-पूर्वांचल असे वर्णन केले आणि लिहिले की, ते फक्त हृदयातील लोकांसाठी जिवंत राहतील, ओ दिल, त्याच्या मृत्यूचे दु: ख करू नका. फैयाजने पुढे लिहिले की, पुढे येऊन लढण्याचे धाडस त्याच्यात नव्हते, त्याने कपटाने आणि पिंजऱ्यात सिंहाला मारले. गुडबाय शेर-ए-पूर्वांचल देखील लिहिले. मुख्तार अन्सारी








