
मुकेश यांनी मुंबईत आल्यावर रोशन तनेजा अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी अभिनयाचे धडे घेतल्यानंतर दिग्दर्शक संजय खान यांच्या ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’ या मालिकेत त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. त्यांना सतत छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या. त्यानंतर ‘गुप्त’, ‘बंधन’, ‘सूर्यवंशम’, ‘गर्व’, ‘गुंडा’, ‘सरफरोश’ अशा मोठ्या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका मिळू लागल्या. या भूमिकांमुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले.






