
अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने हिंदी आणि तेलुगु दोन्ही चित्रपटांमध्ये काम करून मनोरंजन विश्व गाजवले आहे. ‘मुझसे कुछ कहती…ये खामोशियां’ आणि ‘कुमकुम भाग्य’ या टेलिव्हिजन मालिकांमधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर मृणाल ठाकूर हिने ‘लव्ह सोनिया’मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर, २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपर ३०’ आणि ‘बाटला हाऊस’ या चित्रपटांद्वारे तिने मनोरंजन विश्वात ओळख मिळवली. याशिवाय तिने शाहिद कपूरसोबतही काम केले आहे. तर, तिचा ‘सीता रामम’ हा साऊथ चित्रपटही खूप गाजला. मृणाल ठाकूर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.