
सध्या सोशल मीडियावर ‘मोये मोये’ गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण ‘मोये मोये’वर थिरकताना दिसत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का भारतीय पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी सर्वात आधी ‘मोये मोये’ हे गाणे गायले होते. हो तुम्ही बरोबर ऐकलत. स्वत: दलेर मेहंदी यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.