
मौसमी आणि जयंत यांना पायल आणि मेघा अशा दोन मुली होत्या. २०१९ मध्ये त्यांच्या मोठ्या मुलीचे निधन झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या मुलीला डायबिटीस झाला होता. अनेक वर्ष डायबिटीसचा सामना केल्यावर २०१९मध्ये त्यांच्या मुलीचे निधन झाले. या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसला होता. मुलीच्या मृत्यूनंतर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. आज मौसमी सर्वांपासून दूर असून स्वत:चे आयुष्य जगताना दिसत आहेत.






