Mohammed Rafi Birthday: गाणं गातानाच अचानक रडू लागले होते मोहम्मद रफी! किस्सा ऐकलात?

0
16
Mohammed Rafi Birthday: गाणं गातानाच अचानक रडू लागले होते मोहम्मद रफी! किस्सा ऐकलात?


Mohammed Rafi Birth Anniversary: बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांची आज ९९वी जयंती आहे. २४ डिसेंबर १९२४ या दिवशी अमृतसरच्या कोटला सुलतान सिंह येथे राहणाऱ्या हाजी अली मोहम्मद यांच्या घरात मोहम्मद रफी यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने मोहम्मद रफी आपल्या भावासोबत नाव्ह्याच्या दुकानात काम करत होते. हेच काम करत असताना त्यांच्या कानावर एका सुफी साधूच्या गाण्यांचा आवाज पडत होता. या सुफी गाण्यांमुळे रफी यांच्यातील कला देखील जागी झाली होती. हळूहळू त्यांनी आपल्या कलेला प्राधान्य देऊन, पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या आवाजाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. मोहम्मद रफी यांच्या आवाजाने सगळेच तल्लीन होऊन जातात. मात्र, त्यांचे एक गाणे असे होते, जे गाताना स्वतः रफीदेखील खूप रडले होते.



Source link