
Mohammed Rafi Birth Anniversary: आपल्या आवाजाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक मोहम्मद रफी यांची जयंती नुकतीच पार पडली आहे. त्याच्या ९९व्या वाढदिवसानिमित्ताने १७व्या मोहम्मद रफी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एक मोठी घोषणा करत सगळ्यांनाच एक आनंदाची बातमी दिली आहे. येत्या वर्षी म्हणजेच २०२४ हे मोहम्मद रफी यांचे जन्म शताब्दी वर्ष असणार आहे. याच निमित्ताने दिल्लीतील ‘भारत मंडपम्’च्या प्रांगणात रफी साहेबांचा १०० वा वाढदिवस शानदार पद्धतीने साजरा करू, अशी घोषणा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.








