
मनसेमध्ये पहिल्यांदाच अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर संघर्ष उफाळला आहे. मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार यांच्यात आज खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाबाहेर मोठा राडा झाला. नवी मुंबईत कामगार नेते महेश जाधव यांच्या समर्थक माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या परिसरातच माथाडी कामगारांनी मनसे कार्यर्त्यांना ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. मोठ्या संख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.




