mlc election : काँग्रेसचा उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेनं पळवला?; नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

0
22
mlc election : काँग्रेसचा उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेनं पळवला?; नाना पटोले नेमकं काय म्हणाले?


‘कोकण, मुंबई व नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर व नाशिकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं जाहीर केली होती. परंतु शिवसेनेनं परस्पर कोकण, नाशिक व मुंबई मतदारसंघासाठीचे उमेदवार जाहीर केले. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगलं यश मिळू शकेल यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांना संपर्क केला तेव्हा ते परदेशात होते. आज मातोश्रीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं नाना पटोले म्हणाले.



Source link