
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आई शांतीराणी देवी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. गुरुवारी ६ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिथून यांचा मुलगा नमाशी चक्रवर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.








