
काय म्हणाला मिसबाह?
एका स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना मिसबाहने २००७ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यातील वेदना आठवल्या. मिसबाह म्हणाला की, “भारताने दिलेलं लक्ष्य फार मोठे नव्हते. आम्ही हा सामना सहज जिंकू असे आम्हाला वाटत होते. फिरकी गोलंदाजांसमोर आमच्या फलंदाजांना शक्यतो अडचण येत नाही. आम्ही सामन्याची सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आमचे फलंदाज अपयशी ठरले. आम्ही अवघ्या ७७ धावांवर ६ फलंदाज गमावले होते. पण यासर अराफत आणि सोहेल तन्वीर यांच्यासोबतच्या माझ्या भागीदारीने विजयाच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या. अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर मला वाटले की, आम्ही सहज जिंकू, पण हा अतिआत्मविश्वास होता. यामुळे आम्ही विश्वचषक गमावला. क्रिकेट असा खेळ आहे की, एका चुकीमुळे संपूर्ण मेहनतीवर पाणी फेरले जाते.”







