पुणे, साहस Times — पुण्यातील नांदेड सिटी परिसरात मध्यरात्री चकित करणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीचा गळा दाबून खून केलेला एक पती मृतदेह दुचाकीवरून नेत असताना पोलिसांच्या हाती लागला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबीता राकेश निसार (मृत) हिचा पती राकेश रामनायक निसार याने मंगळवारी रात्री दीड वाजता पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान त्याला हटकले. राकेशचे वागणे संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सध्या राकेशवर गुन्हा दाखल करण्यात आला असून खुनामागील कारणांचा तपास सुरू आहे.