MHT CET Results 2024 : एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर, यंदा किती विद्यार्थी १०० पर्सेंटाइलचे मानकरी? वाचा सविस्तर

0
18
MHT CET Results 2024 : एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर, यंदा किती विद्यार्थी १०० पर्सेंटाइलचे मानकरी? वाचा सविस्तर


राज्य समाइक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जाहीर करण्यात आला. पीसीएम, पीसीबी गटांसाठी एमएचटी सीईटी निकाल आज, १६ जून रोजी जाहीर केला आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आली होती. त्यात राज्यातील ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. परीक्षेला बसलेले उमेदवार cetcell.mahacet.org आणि portal. maharashtracet.org आणि  महासीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. तसेच  स्कोअरकार्ड डाऊनलोड करू शकतात. 



Source link