Mhada Lottery: मुंबई म्हाडाच्या २०३० घरांची आज सोडत; घर मिळाली की नाही? हे कुठे आणि कसे पाहायचे?

0
3
Mhada Lottery: मुंबई म्हाडाच्या २०३० घरांची आज सोडत; घर मिळाली की नाही? हे कुठे आणि कसे पाहायचे?


Mhada Lottery 2024: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाकडे ऑगस्टमध्ये सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आलेल्या म्हाडा लॉटरी २०२४ साठी मुंबईतील २ हजार ०३० घरांसाठी आज सोडत जाहीर केली जाणार आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज (८ ऑक्टोबर २०२४) सकाळी १०.३० वाजता निकाल जाहीर केला जाईल. या परवडणाऱ्या घरांसाठी १ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. या सोडतीमध्ये गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवार नगर, पवई यासह अन्य ठिकाणच्या घरांचा समावेश आहे.



Source link