Maratha Protest : आंदोलक गिरगाव चौपाटीवर ऐकवटले; आंदोलकांची धरपकड; मरीन ड्राइव्ह परिसरात चोख बंदोबस्त

0
23
Maratha Protest : आंदोलक गिरगाव चौपाटीवर ऐकवटले; आंदोलकांची धरपकड; मरीन ड्राइव्ह परिसरात चोख बंदोबस्त


Maratha Kranti Morcha Protest Updates: आरक्षणासाठी मुंबईत मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलक करण्यात येणार असल्याचा मेसेज बुधवारी समाजमध्यमांवर व्हायरल झाला होता. आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडकणार असल्याचे पोलिसांना कळल्याने मरीन ड्राइव्ह परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, हा मेसज खरा ठरला. मोठ्या प्रमाणात आंदोलक हे गिरगाव येथे जमले आहेत. येथून हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानावर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. आंदोलक हे या मार्गाने पुढे निघाले आहेत. विविंग डेक परिसरात आंदोलक आल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले आहे.



Source link