Manipur Violence | मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ गर्भित इशारा; आता… | Navarashtra (नवराष्ट्र)

0
77
Manipur Violence | मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ गर्भित इशारा; आता… | Navarashtra (नवराष्ट्र)


मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान हिंसाचाराशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आधी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला.

इम्फाळ : मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान हिंसाचाराशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आधी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला. यानंतर दोन मैतेई तरुणांना गोळ्या घालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आता राज्य सरकारने हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या व्हिडिओंवर कडक कारवाई केली आहे. राज्यात हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान करणारे व्हिडिओ व्हायरल होण्यापासून थांबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जो कोणी अशा व्हिडिओचा प्रचार करेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे सरकारने सांगितले आहे.






Source link