Malshej Ghat Accident : माळशेज घाटात बस-ट्रकची जोरदार टक्कर; २० प्रवासी गंभीर जखमी

0
18
Malshej Ghat Accident : माळशेज घाटात बस-ट्रकची जोरदार टक्कर; २० प्रवासी गंभीर जखमी


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास भरधाव एसटी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली आहे. त्यामुळं धावता ट्रक पलटी झाला तर एसटी बसच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालं. बसमधून प्रवास करत असलेल्या २० प्रवाशांना गंभीर मार लागला आहे. अपघाताची माहिती समजताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी प्रवाशांना अपघातग्रस्त एसटी बसमधून बाहेर काढण्यात आलं. एसटी बस कल्याणहून जुन्नरच्या दिशेने जात होती. तर ट्रक कल्याणच्या दिशेने निघालेला होता. पोलिसांनी सर्व जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. त्यानंतर सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.



Source link