
गेल्या आठवड्यात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर झाला होता गोळीबार
गेल्या आठवड्यातच मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर आता पुन्हा ही घटना घडल्याने मालेगाव पुन्हा हादरले आहे. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. यामुळे तणाव निवळला.





