
महिमा विषयी बोलायचे झाले तरे काही दिवसांपूर्वी महिमाला कर्करोग झाल्याचे समोर आले. तिने त्यावर मात देखील केली. अभिनेते अनुपम खेर यांनी महिमाचा व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली होती. त्यांनी महिमाचा व्हिडीओ शेअर करत, ”मी एक महिन्या आधी महिमा चौधरीला फोन केला. तेव्हा मी यूएसमध्ये होतो. माझ्या ५२५ व्या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या भूमिकेबाबत मला महिमा यांच्यासोबत चर्चा करायची होती. त्यानंतर आमचे बोलणे झाले. तेव्हा मला कळाले की, महिमाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. तिची जगण्याची पद्धत आणि तिचा दृष्टिकोन जगभरातील महिलांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा देऊ शकतो” या आशयाचे कॅप्शन दिले होते. तेव्हा महिमाला कर्करोग झाला आहे याची माहिती समोर आली.






