
Happy Birthday Mahesh Manjrekar: आपल्या आयुष्याच्या मार्गावर आलेले ‘काटे’ कुणाला बरं आवडतात? प्रत्येक जण असे काटे आयुष्यातून काढून टाकायच्या मागे लागलेला असतो. मात्र, मनोरंजन विश्वात एक असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या आयुष्यात ‘काटे’ आले आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलूनच गेलं. ही व्यक्ती आहे हिंदी-मराठी मनोरंजन विश्व गाजवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते महेश मांजरेकर. त्यांनी सिनेसृष्टीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाची जागा तर मिळवलीच, पण एक उत्तम अभिनेताही बनले. आज (१६ ऑगस्ट) महेश मांजरेकर त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…