
भट्ट यांच्यानुसार एकदा एका फिल्मी पार्टीतून उशिरा रात्री ते जुहू येथील जेव्हीपीडी स्कीम येथून चालत त्यांच्या लोखंडवाला कॉम्पलेक्स येथील घरी परत जात होते. ते पार्टीत जरी भरपूर मद्य प्यायले होते तरी आपण पार्टीच्या ठिकाणाहून जवळ असलेल्या घरी पायी चालत जाऊ शकतो असा विश्वास त्यांना होता. परंतु काही अंतर चालत गेल्यानंतर ठेच लागून ते जमिनीवर पडले आणि रात्रभर तसेच फुटपाथवर पडून होते. पहाटे तांबडे फुटले तेव्हा त्यांना जाग आली… आपण रस्त्याच्या कडेला एका दगडी खडीच्या ढिगावर संपूर्ण रात्र उताणे पडून होतो, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे पाकिट चोरीला गेले होते. उठून आपण तडक घरी गेलो. मात्र घरी कुणाला हा किस्सा सांगितला नव्हता, असे भट्ट यांनी स्वत: सांगितले होते.








