Mahesh Babu Daughter: महेश बाबूची लेक झळकली टाइम्स स्क्वेअरवर, वयाच्या ११व्या वर्षी घेतले इतके मानधन

0
14
Mahesh Babu Daughter: महेश बाबूची लेक झळकली टाइम्स स्क्वेअरवर, वयाच्या ११व्या वर्षी घेतले इतके मानधन


सिताराने तिच्या पदार्पणाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टाईम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर आपल्या मुलीच्या पदार्पणाबद्दल महेश बाबूलाही खूप आनंद झाला आहे. अभिनेत्याने मुलीच्या एवढ्या मोठी कामगिरीची पोस्ट देखील शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी, सिताराने देखील तिच्या पदार्पणाची माहिती देत शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टाईम्स स्क्वेअर…. मी यापेक्षा अधिक आनंदी कधीच होऊ शकले नसते… पीएमजे ज्वेलरी तुमच्याशिवाय मी हे करूच शकले नसते.’ महेश बाबूनेही तिची पोस्ट शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टाईम्स स्क्वेअरवर… खूप अभिमान आहे आम्हाला तुझा… अशीच चमकत राहा’.



Source link