
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा स्थिर राहणार असून उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हळूहळू तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता थंडीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.




