Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

0
18
Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने  झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट


Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे आहेत. १५ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना १५ मे पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा, ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा



Source link