
Maharashtra weather update : राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. पुणे, मुंबईसह राज्याच्या कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट नोंदवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत असून ही थंडी नव वर्षात देखील कायम राहणार आहे. दरम्यान, थंडी सोबत पावसाची देखील रिमझिम होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.







