
Maharashtra Wether Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहे. आज देखील राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी थंडी आणि तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात काही भागात आज तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात बुधवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. आज देखील पुण्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. तर मुंबई आणि पुण्यात उड्यापासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा







