
Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पाडला आहे. सध्या मॉन्सून राज्यात प्रगती करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. आजपासून पुढील काही दिवस कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच ते सात दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड तर मुंबई, पुण्यासह पालघर रायगड जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.






