
विदर्भात असे असेल हवामान
हवमान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. चंद्रपूर, नागपूर, भंडारा व यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची व गारपिट होण्याच्या इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सूर्य आग ओकणाऱ्या विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. या सोबतच अकोला, अमरावती, जळगाव, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



