
पुणे जिल्ह्यात हुडहुडी वाढणार
पुणे जिल्ह्यात पुढील ७२ तास सकाळी हलके धुके तसेच आकाश दुपारी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सात तारखे नंतर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे . तसेच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात आजपासून ते नऊ तारखेपर्यंत पुणे जिल्ह्यात दोन ते चार डिग्री सेल्सियस तर पुणे शहरात दोन ते तीन डिग्री सेल्सियस घट होण्याची शक्यता आहे.






