
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकणात रत्नागिरी व रायगड तर विदर्भात अकोला, बुलढाणा, अमरावती व नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. पुण्यातील घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.