Maharashtra Rain News : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; पाहा हवामान खात्याचा अंदाज

0
16
Maharashtra Rain News : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; पाहा हवामान खात्याचा अंदाज

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशीव तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे. आजपासून पुण्यासह सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातील खेड, चिपळूण, गुहागर आणि सावंतवाडीत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Source link