
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण तापलं आहे. येथे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमधील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे (samarjeet Ghatge) यांनी भाजपला राम राम ठोकत शरद पवार गटात सामील होण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच समरजित घाटगे यांनी सोशल मीडिया हॅण्डलवरून कमळ हटवलं आहे. आपल्या सोशल मीडिया वॉलवर वारसा शाहूंचा,लढा सर्वसामान्यांचा असं लिहिलं आहे.




