
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना विचारण्यात आले की, शिंदे-फडणवीसांना बहुमताची गरज नसताना अजित पवारांना सरकारमध्ये का घेतले? यावर संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवारांची राष्ट्रवादीत घुसमट होत होती. पक्षात ते नाराज असल्याच्या सारख्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे अजित पवार इकडं येणार हे सर्वांनाच माहिती होतं. सरकारकडे १७२ आमदारांचे बहुमत असताना राष्ट्रवादीला सोबत का घेतले असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र राजकारणात काही समीकरणे तयार करताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या जातात. लोकसभा, विधानसभा असेल. पक्षाची ताकद असतेच परंतु वैयक्तिक ताकदही पणाला लावली जाते. त्यामुळे निवडणुका जिंकणं सोपेजातं. आम्ही ४५ जिंकू, ४८ जिंकू म्हणतो, पण हे कसे याचे आराखडे बांधले जातात. तोच आराखडा शिंदे-फडणवीस यांनी बांधला आहे, असे शिरसाट म्हणाले.







