
अजित पवार गटाच्या बैठकीला कोणत्या आमदारांची दांडी?
आज अजित पवार गटाच्या आमदारांच्या बैठकीला ५ आमदार अनुपस्थित राहिले. मिळालेल्या माहितीनुसार आमदार नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे, अन्ना बनसोडे आणि धर्मराव बाबा अत्राम बैठकीत हजर नव्हते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत या गोष्टीवर चर्चा झाली की, लवकरात लवकर कॅबिनेट विस्तार केला जावा. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील अपयशावरही चर्चा झाली.





