
मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागात उष्माघाताच्या घटना समोर आल्या आहेत. २८ दिवसात उष्माघाताच्या २३ घटना समोर आल्या आहेत. त्यातील १० घटना १० दिवसात घडल्या आहेत. उष्माघाताच्या सर्वाधिक घटना अमरावती जिल्ह्यात घडल्या असून ते तीन रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यानंतर रायगड, पुणे, बीड, बुलढाणा व कोल्हापुरात प्रत्येक २-२ घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर ठाणे, अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड व सातारा जिल्ह्यात उष्माघाताच्या एक-एक घटना समोर आल्या आहेत. उष्माघाताने राज्यात मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये ३० वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू उष्माघाताने झालेल्याते सांगितले जात आहे, मात्र आरोग्य विभागाने याला दुजोरा दिलेला नाही.







