
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात १०५ अंतिम उमेदवार
मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आज उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम १०५ उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज दिली. उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या अखेरच्या दिवशी १२ जणांनी माघार घेतली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.





