Maharaashtra Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

0
22
Maharaashtra Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट


Maharashtra Weather Update : राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात, मराठवाड्यात तर पश्चिम महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नाशिक, धुळे, अहमदनगर, बीड, आणि जळगाव, नंदुरबार, जालनासह विदर्भातील नागपूर वर्धा यवतमाळ या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडणार असल्याने यलो अलर्ट देण्यात आला असून बाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा



Source link